Shri Baneshwar Arts, Commerce & Science College,Burhannagar

Shri Baneshwar Shikshan Sanstha's

Arts, Science and Commerce College , Burhannagar,
Ahmednagar

| मराठा तितुका मेळवावा |

Scholarship

विद्यार्थ्यांना मिळू शकणाऱ्या विविध सवलती व शिष्यवृत्या

शिष्यवृत्तीचे नांव

भारत सरकारची शिष्यवृत्ती (मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता)

अटी व पात्रता

मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थीनी मार्च/एप्रिल २०२० परीक्षेत उत्तीर्ण होऊन वरीष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल त्यांनी अर्ज करावयाचेआहेत. ही सवलत एकाच कुटुंबातील दोन आपत्यांना मिळू शकते. मुलींसाठी संख्येचे बंधन नाही. उत्पन्न मर्यादा रु. एक लाखाच्या आत असावे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना समाज कल्याणविभागाच्या वेबसाईटवर फॉर्म भरुन महाविद्यालयात त्याची प्रिन्टआऊट कॉलेजमध्ये जमा करणे बंधनकारक आहे.

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) मागील परीक्षा पास झालेल्या गुणपत्रिकाच्या साक्षांकित दोन प्रती.

२) इयत्ता १२ वी शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित दोन छायाप्रती.

३) आई/वडील/पालक नोकरीत सवलत घेतली तेथील मंजूर आदेश क्रमांकअसल्यास कार्यालय प्रमुखांचा मागीलवर्षातील (१-४-२०१९ ते ३१-३-२०२०) उत्पन्नाचा मूळ दाखला (मुळ पगार + महागाई भत्ता+घरभाडे इ.सह)

४) नोकरीत नसल्यास तहसिलदार यांनी दिलेला मूळ उत्पन्न दाखलासन २०१९-२०

५) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखलादोन साक्षांकित छायाप्रती

६) वडील हयात नसल्यास मृत्यूचादाखल्याची छायांकित प्रत

७) आई/वडील विभक्त असल्यासप्रतिज्ञापत्र व इतर पुरावे (कोर्टात)

८) शैक्षणिक खंड असल्यास गॅपसर्टिफिकेट

९) मागील वर्षी ज्या महाविद्यालयात

१०) जिल्हातील असल्यास पूर्वीच्या जिल्ह्यातील मा.समाज कल्याणअधिकारी वर्ग-१ यांचे प्रमाणपत्र

११) राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे वआधार कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे.

१२) जात पडताळणी प्रमाणपत्र

१३) आधार कार्ड झेरॉक्स

शिष्यवृत्तीचे नांव

२  बी.सी.फ्रीशीप (मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता)

अटी व पात्रता

१) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक वेळ नापास झालेल्यांना फी सवलत मिळत नाही.

२) उत्पन्न मर्यादा वार्षिक रु.१,००,०००/- च्या पुढे

३) तीन किंवा तीन पेक्षा जास्तअपत्य असल्यास लाभ मिळतो.

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) मागील परीक्षा पास झालेल्या गुणपत्रिकाच्या साक्षांकित दोन प्रती.

२) इयत्ता १२ वी शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित दोन छायाप्रती.

३) आई/वडील/पालक नोकरीत सवलत घेतली तेथील मंजूर आदेश क्रमांकअसल्यास कार्यालय प्रमुखांचा मागीलवर्षातील (१-४-२०१९ ते ३१-३-२०२०) उत्पन्नाचा मूळ दाखला (मुळ पगार + महागाई भत्ता+घरभाडे इ.सह)

४) नोकरीत नसल्यास तहसिलदार यांनी दिलेला मूळ उत्पन्न दाखलासन २०१९-२०

५) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखलादोन साक्षांकित छायाप्रती

६) वडील हयात नसल्यास मृत्यूचादाखल्याची छायांकित प्रत

७) आई/वडील विभक्त असल्यासप्रतिज्ञापत्र व इतर पुरावे (कोर्टात)

८) शैक्षणिक खंड असल्यास गॅपसर्टिफिकेट

९) मागील वर्षी ज्या महाविद्यालयात

१०) जिल्हातील असल्यास पूर्वीच्या जिल्ह्यातील मा.समाज कल्याणअधिकारी वर्ग-१ यांचे प्रमाणपत्र

११) राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे वआधार कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे.

१२) जात पडताळणी प्रमाणपत्र

१३) आधार कार्ड झेरॉक्स

शिष्यवृत्तीचे नांव

३  राज्य सरकारची खुली गुणवत्ता

अटी व पात्रता

एच.एस.सी.परिक्षेत किमान गुण ७५ % असावेत. या शिष्यवृत्तीचा लाभ तीन वर्षासाठी असतो. उत्पन्न मर्यादा वार्षिक रु. २५,०००/-

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) विहीत नमुन्यातील फॉर्म

२) गुणपत्रिकेच्या दोन साक्षांकित छायाप्रती

३) मा.तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला सन २०१९-२०

शिष्यवृत्तीचे नांव

४ राष्ट्रीय गुणवत्ता राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती (पदवीपर्यंत)

अटी व पात्रता

एच.एस.सी.परीक्षेत किमान गुण ७५% असावेत. या शिष्यवृत्तीचा लाभ तीन वर्षासाठी असतो. उत्पन्न मर्यादा रु.१,००,०००/- च्या आत असावे. अशा विद्यार्थ्यांची एच.एस.सी. बोर्ड निवड करते. त्याचप्रमाणे फॉर्म महाविद्यालयात उपलब्ध होतात आणि ज्या महाविद्यालयात एच.एस.सी. परीक्षा दिली तेथून फॉर्म घ्यावा.

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) विहित नमुन्यातील फॉर्म

२) गुणपत्रिकेच्या दोन साक्षांकित छायाप्रती

३) उत्पन्न दाखला तहसिलदार यांचे सहीचा

४) प्रतिज्ञापत्र

 ५) दाखला झेरॉक्स. 

६) फोटो दोन

७) जातीचा दाखला झेरॉक्स

शिष्यवृत्तीचे नांव

अपंग शिष्यवृत्ती

अटी व पात्रता

जो विद्यार्थी ४० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आलेले असेल त्यांना फॉर्म भरता येईल. उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून उत्पन्न दाखला मा. तहसिलदार यांचे सहीचा असावा.

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) विहीत नमुत्यातील फॉर्म

२) गुणपत्रिकेच्या दोन साक्षांकित छायाप्रती.

३) मा. तहसिलदार यांचे सहीचा उत्पन्न दाखलमूळ व छायाप्रत

४) जिल्हा वैद्यकिय अधिकारी, (सिव्हील सर्जन) यांचेकडील दिलेले अपंग प्रमाणपत्र २ साक्षांकित प्रती.

शिष्यवृत्तीचे नांव

६  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिष्यवृत्ती

अटी व पात्रता

१) आर्थिक दुर्बलता.

२) सामाजिक मागासलेपणा.

३) ग्रामीण पार्श्भुमी

४) शैक्षणिक गुणवत्ता.

५) इतर शिष्यवृत्यांद्वारे मिळणारे अर्थसहाय्य

६) देवदासी, वारांगणा आणि एडस्ग्रस्त मुलांना विशेष प्राधान्य.

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) विहीत नमुन्यातील फॉर्म

२) उत्पन्न दाखला १,००,०००/पेक्षा जास्त नसावा.

३) मार्कशीट झेरॉक्स

४) दाखला झेरॉक्स.

५) फोटो.

६) भारतीय स्टेट बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.

७) महाराष्ट्र बँक

शिष्यवृत्तीचे नांव

७  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती

अटी व पात्रता

१) आर्थिक दुर्बलता

२) सामाजिक मागासलेपणा

३) ग्रामीण पार्श्वभुमी

४) शैक्षणिक गुणवत्ता

लागणारी प्रमुख कागदपत्रे

१) विहीत नमुन्यातील अर्ज.

२) उत्पन्न दाखला ८,००,०००/- पर्यंत.

३) मार्कशीट झेरॉक्स.

४) दाखला झेरॉक्स

५) फोटो २.

६) सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ २ अपत्यांपर्यंत मर्यादित असेल.

७) या योजनेचा लाभ दुरस्थ पद्धतीने अथवा अर्धवेळ स्वरुपात चालविलेल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

८) राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे व आधार कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे.